Ad will apear here
Next
‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद
मुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा– छोटे सुरवीर’ या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूरनंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला.

प्रचंड तयारीने आलेल्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. पुणे येथील इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅंपस, टिळक रोड येथे या ऑडिशन्स पार पडल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’च्या पुणे केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडिशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. श्रीनिधी देशपांडे, नंदिनी गायकवाड, ईशिता मोडक, अक्षय चारभाई, धीरज शेगर, चैतन्य देवडे, आदी भारतीया आणि अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे.  

पुणे ऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली; परंतु या आठ स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्समध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. चैतन्य देवडे याने ‘माझी मैना गावाकडे राहिली’, तर अक्षय चारभाई याने ‘लाजून हसणे’ ही गाणी सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच नंदिनीने देखील तिच्या अप्रतिम गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पुढील ऑडिशन्स नागपूरमध्ये रंगणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’चे मागील पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद असून, हे पर्व छोटे सूरवीर  गाजवणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVHBQ
Similar Posts
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद पुणे : ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी व्यक्त केली.
‘कलर्स मराठी’वर ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ मुंबई : यशाच्या शिखरावर पोचलेल्या आणि लोकांनी नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते. या व्यक्तीचा जीवनप्रवास, त्यांच्याबद्दल कधी न ऐकलेले किस्से, माहिती आता उलगडणार आहे ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या नव्या कार्यक्रमातून. ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २० सप्टेंबरपासून गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language